Monday, 28 April 2014

II मोबाइल पुराण II




II मोबाइल पुराण II

मोबाईलची गोष्टच लई भारी..
बोलायची ह्यावर गम्मत न्यारी..
गप्पांसाठी आहे सार्वजनिक ग्यालरी..
पलिकडे बोलायला प्रिया त्याची प्यारी..!!

दबका ह्याचा आवाज नजर चोरटी..
झडतात गुपचूप गप्पांच्या फैरी..
इयरफोन कानास लावून स्वारी..
वेड्यागत कसे हातवारे करी..!!

बोलणा-याची इथे वा-यांवर सवारी..
अचंबित होतात शेजारी पाजारी..
म्हणती असता माणसे घरी..
हा मात्र फोनवर बोंबलत फिरी..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment