Wednesday, 23 April 2014

।। आयुष्याच्या वळणावर ।।



।। आयुष्याच्या वळणावर ।।

आयुष्याच्या वळणावर..
मी दिला शब्द पाळला आहे..
जीवनातून तुझ्या..
मी मला गाळला आहे..!!

झाली सांज वेळ..
जीव उषेत जडला आहे..
मझ्या मनाचा रवी..
अजुन तेथे अडला आहे..!!

आठवांचा हर क्षण..
मी अजुनही जपला आहे..
सुकल्या फुलांचा त्या..
गंध कुपित लपला आहे..!!

मोत्यांच्या सोस तुला..
मी यत्किंचित शिंपला आहे..
प्रेमाच्या मोत्याविन..
जीव इथेच संपला आहे..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment