Monday, 28 April 2014

II अबोलीचे बोल II




II अबोलीचे बोल II

अबोलीचे बोल..मना भावले..
अबोलीने मज.. वेड लाविले..!!

सुंदर केशरी.. देखणे रुपडे..
फिटे पारणे..काळीज उडे..!!

टंच कळी.. दवात भिजली..
अंगात जशी.. ज्वानी पेटली..!!

फुलला गजरा..अल्लड नखरा..
येता जाता..वळती नजरा..!!

रुळे केसात..नागिणीची चाल
मोहक हालचाल..जीव बेहाल..!!

मंद गंध..करितसे धुंद..
अबोलीचे बोल..मुक्त स्वच्छंद..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment