II माणूस II
नमस्कार मी माणूस..
आज माझ्याच बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.. खरं तर मी पूर्णतः पराधीन.. तरीही ह्या श्रुष्टीवर हुकुमत गाजवू पाहतो.. तशी माझी सुप्त इच्छाच असते.. मग त्यासाठी माझी वाटेल ते करायची तयारी असते..
बालपणी मी दिसायला गोंडस सर्वाना हवा हवासा वाटतो.. ह्या दिनी मी पोटाची खळगी भरली की निश्चिंत असतो.. लोभ, मोह, माया, मत्सर ह्यापासून मी खूप दूर असतो.. सर्वसमावेश सहवास मला हवाहवासा वाटतो.. मित्र कोण शत्रू कोण हे माझ्या खिजगणतीत नसत.
जसं जसा मी मोठा होत जातो.. तस तसे राग, लोभ, मोह, मत्सर, माया इत्यादी दुर्गुण माझ्या शरीरात चोर पावली प्रवेश करतात.. नकळत मीच त्यांस शिरकाव करू देतो.. शरीराबरोबर ते सुद्धा विशाल रूप धारण करतात आणि नकळत वर्चस्व गाजवू लागतात.. मग मी माणूस आहे हेच मुळी विसरतो.. मिळेल त्या मार्गाने इतरांवर वर्चस्व मिळवू पाहतो.. मग त्यासाठी मी श्रुष्टीवर व त्यावरील जीवांवर अमर्याद अत्याचार करतो.. माझ्या प्रेमात ही मिळविण्याची हाव असते. माझ्या डोळ्यात फक्त मी आणि मीच असतो.. कधी स्वार्थापोटी मी इतरांना जवळ करतो..तर कधी दूर लोटतो.. इतके सारे करूनही मी समाधानी नसतो.. कारण माझं मन मेलेलं असतं.. माझ्यातील माणूस मृत झालेला असतो..
कालांतरे माझं शरीर जर्जर होते..अन पुन्हा माझ्यातील माणूस जागा होतो..ज्याने मला जन्म दिला मी त्याचा शोध घेऊ लागतो..इतकी वर्षे उलटली त्याची आठवण काढली नाही याचा पश्चाताप मी त्या वेळी करतो.. क्षमा याचना करतो..ह्या व्यतिरिक्त हाती काहीच नसत.. माझे जीवन सुद्धा माझ्या हातात नसते.. हे सुद्धा तेव्हा जाणवते आणि एके दिवशी अचानक शरीर राम म्हणते.. क्षणात अस्तित्व संपते.. आलो रिता आणि जातो सुद्धा रिताच.. कारण मी पराधीन असतो..
मी तेव्हा पराधीन होतो आता ही पराधीन आहे.. मग का मी हुकुमत गाजवू पाहतो..? का मी माणूस आहे हेच मुळी विसरतो.. ? काळ येतो काळ जातो पण परिस्थितीत कुठे हो फरक पडतो..?? माणूस आपल्याच ब्रीदास सोयीस्कर रीत्या विसरतो.
धन्यवाद...
*चकोर*

No comments:
Post a Comment