|| माझी मराठीची बोली ||
==============
गोड अमृताची बोली
माझ्या हृदयी रुजली..
खोल सागराची खोली
माझी मराठीची बोली..!!
==============
गोड अमृताची बोली
माझ्या हृदयी रुजली..
खोल सागराची खोली
माझी मराठीची बोली..!!
किती सुंदर वलय
शोभे देवाचे आलय..
झुले सह्याद्री मलय
सुज्ञ ज्ञानाचा प्रलय..
तिची शीतल सावली
माझी मराठीची बोली..!!
शोभे देवाचे आलय..
झुले सह्याद्री मलय
सुज्ञ ज्ञानाचा प्रलय..
तिची शीतल सावली
माझी मराठीची बोली..!!
राकट रांगडी माती..
नाही संकटाची भीती..
किती सांगावी महती
आपुलकीची ही नाती..
खेड्यापाड्यात जपली
माझी मराठीची बोली..!!
नाही संकटाची भीती..
किती सांगावी महती
आपुलकीची ही नाती..
खेड्यापाड्यात जपली
माझी मराठीची बोली..!!
जशी दुधावर साय
तशी मृदू माझी माय..
माझा गर्व माझा जय
तिचे वंदितो मी पाय..
नभी पताका झुलली
माझी मराठीची बोली...!!
****सुनिल पवार....
✍🏽
*मराठी भाषा दिनाच्या* *हार्दिक शुभेच्छा*
तशी मृदू माझी माय..
माझा गर्व माझा जय
तिचे वंदितो मी पाय..
नभी पताका झुलली
माझी मराठीची बोली...!!
****सुनिल पवार....

*मराठी भाषा दिनाच्या* *हार्दिक शुभेच्छा*
No comments:
Post a Comment