|| महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
भोळ्या शंकरा..
जय ॐ कारा, जय शिवशंकरा
त्रिशूलधारी नमन नटवरा..
हे शिव शंभो देवाधिदेवा
भोळ्या शंकरा, करुणाकरा..!!
त्रिशूलधारी नमन नटवरा..
हे शिव शंभो देवाधिदेवा
भोळ्या शंकरा, करुणाकरा..!!
नीळकंठ तू, सर्पमाळ गळा
चंद्र शोभतो भव्य कपाळा..
भस्म विभूति सर्वांगाला
व्याघ्रचर्म ते झुलते कटीला..
स्मशान वैरागी तू विश्वांबरा
जय ॐ कारा, जय शिवशंकरा..!!
चंद्र शोभतो भव्य कपाळा..
भस्म विभूति सर्वांगाला
व्याघ्रचर्म ते झुलते कटीला..
स्मशान वैरागी तू विश्वांबरा
जय ॐ कारा, जय शिवशंकरा..!!
तू काळाचा महाकाळ
योगीयांचा योगिराज..
कैलास पर्वती विराजित
कृपासिंधु तू त्रिलोकराज..
तूच ब्रह्म, तूच विष्णू, तूच महेश्वरा
जय ॐ कारा, जय शिवशंकरा..!!
योगीयांचा योगिराज..
कैलास पर्वती विराजित
कृपासिंधु तू त्रिलोकराज..
तूच ब्रह्म, तूच विष्णू, तूच महेश्वरा
जय ॐ कारा, जय शिवशंकरा..!!
बेलाची तुज आवड़ भारी
श्वेतपुष्प अर्पितो चरणावरी..
हे गंगाधर हालाहलधारी
आलो प्रभो तुझीया द्वारी..
मज पामराचा उद्धार करा
जय ॐ कारा, जय शिवशंकरा..!!
***सुनिल पवार..✍️
श्वेतपुष्प अर्पितो चरणावरी..
हे गंगाधर हालाहलधारी
आलो प्रभो तुझीया द्वारी..
मज पामराचा उद्धार करा
जय ॐ कारा, जय शिवशंकरा..!!
***सुनिल पवार..✍️
No comments:
Post a Comment