Thursday, 24 April 2014

II घोटाळ्यांचे घोटाळे II

II घोटाळ्यांचे घोटाळे II
हौसेने गेलो मी मत द्यायला..
आयोगाने ते फेटाळले होते..
जागलो मी मताला जिथे..
नाव तिथे गाळले होते..!!

नव्हते कोणी हयात मात्र..
नाव त्यांचे पहिले होते..
जिते जागते मतदार सारे..
वंचित आता राहिले होते..!!

वाहिला पैसा पाण्यासारखा..
काम कुठे दिसले होते..!!
वंचित मतदार झाले बहु..
आयोग झोपेत फसले होते..!!

गडबड झाली सारी याद्यांत..
गाफील सारे राहिले होते..
घोटाळ्यांचे नव घोटाळे..
मी नव्याने आज पाहिले होते..!!
*चकोर*

No comments:

Post a Comment