टवाळकी..
हरे गावाच्या पोपट नगरीत
हरे गावाच्या पोपट नगरीत
झाडाच्या बगलीत
पोपटांची भरली
पोपटांची भरली
लई भारी मीटिंग..!!
आली एक नवी नवेली
नखरेल तिथे पोपटीन..
अजेंडा होता तगड़ा
अजेंडा होता तगड़ा
आता करायची कोणी सेटिंग..!!
पहिला मी पहिला मी
पहिला मी पहिला मी
जो तो बोंबलू लागला..
पैश्याच आमिष दाखवत
पैश्याच आमिष दाखवत
खेळू लागले बेटिंग..!!
एक मत काही होईना
कोणी कुणचे ऐकेना..
हमारा तुमरीवर आले
हमारा तुमरीवर आले
अन सुरु झाली फाईटिंग..!!
मनोरंजन झाले पोपटीनीचे
मनोरंजन झाले पोपटीनीचे
पाहून त्यांचा कल्ला
म्हणाली बसा बोंबलत
म्हणाली बसा बोंबलत
चालले मी
तुम्ही आहात लिस्टवर वोटिंग..!!
मी आधीच आहे एंगेज
झालीय कावळ्यासोबत सेटिंग..
पोपट सारे दंग झाले
पोपट सारे दंग झाले
पाहून तिची नवी एक्टिंग..!!
--शब्द तरंग..
--शब्द तरंग..
No comments:
Post a Comment