।। असा मी तसा मी ।।
डोळस बनुन पाहतो मी..
अंधारात फिरतो मी..
जगाच्या गोष्टी सांगतो मी..
डबक्यात घर करतो मी..!!
सगळे आपलेच मानतो मी..
परक्यास दूर करतो मी..
कनवाळू पणे वागतो मी..
मनात कट रचतो मी..!!
मान सर्वांस देतो मी..
दुराअभिमान पाळतो मी..
वादास सदा टाळतो मी..
मनास तया छळतो मी..!!
असा भी वागतो मी..
तसा भी वागतो मी..
सारेच कांड करतो मी..
तरी श्रेष्ठ ठरतो मी..!!
*चकोर*

No comments:
Post a Comment