II गेमाड गेमिंग II
जिथे जावे तिथे सेटिंग..
माणस बघून देतोय रेटिंग..
चांगलं वाईट गेल चुलीत..
रमतोय इथे जो तो मुलीत..!!
भोळेपणाची करतोय अक्टिंग..
शब्दांवर कुणी खेळतोय बेटिंग..
नावा पुढे लाऊन कवी..
पटवू पाहतोय कोणी छावी..!!
बुरखेधा-यांची वेगळीच फिल्डिंग..
बिन चेह-याची अश्लील चाटिंग..
करतोय कुणी उचलेगिरी..
सगळ्यांवर तो पडतोय भारी..!!
चांगल्याची इथे नेहमीच वेटिंग..
फुटकळ शब्दास मिळतेय व्होटिंग..
सगळ्याच क्षेत्रात साठमारी..
सुटेल कशी फेसबुक नगरी..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment