Thursday, 24 April 2014

II दाह II



II दाह II

श्वासाचे उन्हाळे..
दाह मज जाळे..
वाळवंटास कैसे..
फुटावे उमाळे..

आस कसली..
भास सारे..
कोरड्या नदीचे..
दोन किनारे..!!

हृदयी कैसे..
पाझर फुटावे..
आभाळ सारे..
नयनी दाटावे..!!

चेहरे फसवे..
सारे मुखवटे..
मृगजळा मागे..
व्यर्थ खेटे..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment