Thursday, 24 April 2014

II उपोषण II




II उपोषण II

अण्णा हजारेंच उपोषण..
आम पार्टी ला फळले..
अण्णांचा वापर केला गेला..
हे अण्णांना उशिरा कळले..!!

जंतर मंतर ने जादू केली..
केजरीवालने भूल पाडली..
लोकपालच्या नावा खाली..
नव्या पार्टीची भर पडली..!!

अण्णांचा करिश्मा होता..
दलालांनी फायदा घेतला..
आम आदमीच्या नावाखाली..
पार्टी फंड रग्गड जमवला..!!

दिल्लीत चमत्कार झाला..
कॉंग्रेसवर झाडू फिरला..
जन लोकपाल बिलासाठी..
पुन्हा..
आण्णा बसले उपोषणाला..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment