Wednesday, 23 April 2014

।। ना तुला (°_°) ना मला ।।




।। ना तुला (°_°) ना मला ।।

ना तुला पुसणार..
ना मला सोसनार..
प्राक्तनाच्या रेघा..
गहिऱ्या भासणार..!!

ना तुला उमजणार..
ना मला कळणार..
हृदयाच्या वेदना..
हृदय जाळणार..!!

ना तुला सलणार..
ना मला छळणार..
मनातून सांग..
तू कशी पळणार..!!

ना तुला दिसणार..
ना मला पाहणार..
स्वप्ने डोळा..
नयन वाहणार..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment