II नकोच हळवे क्षण पुन्हा II
नकोच हळवे क्षण पुन्हा...
चांदण्या राती छळणारे..
ज्योत बनून पतंगास जाळणारे..!!
नकोच हळवे क्षण पुन्हा...
विरहात हृदय पोळणारे..
सरिता बनून अश्रू ओघळणारे...!!
नकोच हळवे क्षण पुन्हा...
भावनेशी क्रूर खेळणारे..
साथी बनून अर्ध्यातून पळणारे..!!
नकोच हळवे क्षण पुन्हा...
मृगजळा व्यर्थ भाळणारे..
आपले बनून मज गाळणारे..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment