Thursday, 24 April 2014

II फेसबुक क्षेत्र II



II फेसबुक क्षेत्र II

फेसबुक भासे मज कुरुक्षेत्र..
इथे समजेना गड्या..
कोण शत्रू अन कोण मित्र..!!

कसं ओळखावा इथे बृहन्नडा..
कसा थांबवावा त्यांचा राडा..
शंड त्याच्या वागणुकीला..
कसा शिकवावा हो धड़ा..!!

समजून येते वर्तन सारे..
दाखवावे सांगा कसे कोणा..
दृष्ट्द्युम इथे टपलेत सारे..
सावध व्हो आता द्रोणा..!!

युधिष्टिर इथे नित्य वदे..
नरो वा कुंजरोवा..
अश्वस्थामा नाहक भरडतो..
सांगा सत्य कोणास पुसावा..!!

याचक बनोनी इंद्र कपटी..
(फोटो) कवच कुंडल मागतो..
मरणाचा मग कर्णाचा (स्त्री) ..
कसा मार्ग सुकर होतो..!!

अशा ह्या माया क्षेत्री..
भरवसा हो नच कोणाचा..
श्रीखंडीच्या पदरा आडून..
वेध घेती हो भीष्माचा..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment