Wednesday, 23 April 2014

II शब्दांचा खडखडाट II



II शब्दांचा खडखडाट II

फेसबुक प्रवाहात..
आली गुण गौरवाची लाट..
सोडून रित भात..
वाढे शब्दांचा खडखडाट..!!

शब्दांभोवती पडला वेढा..
जो तो रेटे आपला घोडा..
शब्दांच्या ह्या भाऊ गर्दीत..
शब्द घालिती भलताच राडा..!!

कोण जिंकले कोण हरले..
कोण कसे शब्दात फसले..
कोणाला कसे वश झाले..
का कोणास शब्द डसले..!!

भावनेच्या या मांदियाळीत..
निखळ भाव सारे विरले..
अहं पणाच्या वावटळीत..
प्रत्येकाचे डोके फिरले..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment