II स्वातंत्र भारतात II
स्वातंत्र भारतात.. बोथट झाली धार..
चढली राजकीय गंज..बोलायलाच धार धार..!!
कुरापती काढतो..शेजारी गद्दार..
नेते मिरवती..शांतीचा हार..!!
विझवला ह्यांनीच.. देशप्रेमाचा अंगार..
स्वकीयांवरच करती..लाठीचा प्रहार..!!
शांतीच्या छत्राखाली..मेणबत्तीचा श्रुंगार..
धर्माच्या आडून..होतात बलात्कार..!!
भरलाय सारा..मढ्याचा बाजार..
दलाल करती.. देहाचा व्यापार..!!
माजवला यांनी..सर्वत्र भ्रष्टाचार..
भ्रष्टाचार आता.. झाला शिष्टाचार..!!
फिर्यादीच्या नशिबी..कोठडीचा अंधकार..
गुन्हेगार मोकाट..सोकावलेत फार..!!
राष्ट्र पुरूषांनो..घ्या पुन्हा अवतार..
देशाचा तुम्हीच..करा उद्धार..!!
*चकोर*
स्वातंत्र भारतात.. बोथट झाली धार..
चढली राजकीय गंज..बोलायलाच धार धार..!!
कुरापती काढतो..शेजारी गद्दार..
नेते मिरवती..शांतीचा हार..!!
विझवला ह्यांनीच.. देशप्रेमाचा अंगार..
स्वकीयांवरच करती..लाठीचा प्रहार..!!
शांतीच्या छत्राखाली..मेणबत्तीचा श्रुंगार..
धर्माच्या आडून..होतात बलात्कार..!!
भरलाय सारा..मढ्याचा बाजार..
दलाल करती.. देहाचा व्यापार..!!
माजवला यांनी..सर्वत्र भ्रष्टाचार..
भ्रष्टाचार आता.. झाला शिष्टाचार..!!
फिर्यादीच्या नशिबी..कोठडीचा अंधकार..
गुन्हेगार मोकाट..सोकावलेत फार..!!
राष्ट्र पुरूषांनो..घ्या पुन्हा अवतार..
देशाचा तुम्हीच..करा उद्धार..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment