Monday, 28 April 2014

।। ताई ।।


।। ताई ।।
डोळ्यात अश्रु उमलले..
ताईचे लगीन ठरले..
बालपणीचे खेळ सारे..
डोळ्यात भरुन आले..!!

चुकता मी कधी..
तू धपाटे मज घातले..
प्रेम तुझे त्यातील..
मज आज खरे दिसले..!!

रडता मी खाऊ साठी..
तू आपल्यातले दिले..
विशाल तुझे ह्रदय ताई..
मज अता कुठे कळले..!!

जाशील तू सासरी..
सांग मज कैसे करमेल..
घर सुने सुने भासेल..
आठवण हृदयी असेल..!!

तुझ्या रक्षणार्थ उभा..
सदैव तुझा भाऊ असेल..
सौख्य लाभों ताईला..
मागणे देवा हेच असेल..!!
*चकोर*

No comments:

Post a Comment