II सुप्रभात..सुंदर कोकण किनारा II
झुंजूमुंजू झाली कोकण किनारा..
पहाट वारा अवखळ झोंबरा..
नभ उतरल अवचीत धरा..
धुक्यात हरवला गाव सारा..!!
थंडीचा मोसम शीतल वारा..
काजुच्या झाड़ा बघ आलाय तुरा..
पुसाव्याचा फणस दिसतो ग बरा..
हळूच भरतोय त्यात गरा..!!
मोहरमुकुट आंब्यास शोभतोय बरा..
राजा फळांचा मिरवतोय तोरा..
माडांच्या रांगा शोभे किनारा..
छायेत त्याच्या विसावू ज़रा..!!
वर्णावे किती शब्द अपुरा..
फिटे पारणे पाहुन नजारा..
स्वर्ग जणू उतरला धरा..
असा हां सुंदर कोकण किनारा..!!
*चकोर*
झुंजूमुंजू झाली कोकण किनारा..
पहाट वारा अवखळ झोंबरा..
नभ उतरल अवचीत धरा..
धुक्यात हरवला गाव सारा..!!
थंडीचा मोसम शीतल वारा..
काजुच्या झाड़ा बघ आलाय तुरा..
पुसाव्याचा फणस दिसतो ग बरा..
हळूच भरतोय त्यात गरा..!!
मोहरमुकुट आंब्यास शोभतोय बरा..
राजा फळांचा मिरवतोय तोरा..
माडांच्या रांगा शोभे किनारा..
छायेत त्याच्या विसावू ज़रा..!!
वर्णावे किती शब्द अपुरा..
फिटे पारणे पाहुन नजारा..
स्वर्ग जणू उतरला धरा..
असा हां सुंदर कोकण किनारा..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment