Thursday, 24 April 2014

II प्रेमाच काही खर नसत II



II प्रेमाच काही खर नसत II

प्रेमाच काही खर नसत..
क्षणाच आकर्षण गहिर असत..
दिवसागणिक विरळ होत जात..
अस प्रेम..तकलादू असत..!!

प्रेमाच काही खर नसत..
क्षणात कधी मन बसत..
दिवसागणिक इरेला पेटत..
अस प्रेम एकतर्फी असत..!!

प्रेमाच काही खर नसत..
क्षणा क्षणा मागणी करत..
दिवसागणिक लालची बनत..
अस प्रेम स्वार्थी असत..!!

प्रेमाच काही खर नसत..
प्रत्येक क्षणा उत्कंठ बनत..
दिवसागणिक समंजस होत..
अस प्रेम चिरकाल टिकत..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment