II कर्ण II
काय सांगावी कर्णाची गाथा..
गाथा म्हणावी या म्हणावी व्यथा..
कुंती तयाची होती माता..
पांडवांचा तो जेष्ट भ्राता..!!
कवच कुंडले घेऊन आला..
शापित उपेक्षित जीवन जगला..
सूर्य पुत्र तो तेजस्वी..
सूत पुत्र म्हणोनी उपेक्षीला..!!
मनगटावर त्यास भरवसा होता..
कूट नितिला नव्हता थारा..
दान वीर हो त्या सारखा..
नाही जन्माला कोणी दूसरा..!!
करून गेले कर्णास महान..
कवच कुंड़लाचे अमर दान..
श्री कृष्णे केले गुणगान..
मित्रा कर्णाची महती जाण..!!
मित्रांचा मित्र हा दिलदार..
स्व: कर्तुत्वाने होता घडला..
वर्ण द्वेषाच्या जात्यात मात्र..
कर्ण नाहक भरडला गेला..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment