Thursday, 24 April 2014

II शब्द II


II शब्द II

अचानक एकदा शब्द सारे रुसले..
विचारात आपल्या अलगद फसले..
विचारले मी, बोलले ना काही..
समजावे कसे.समजे ना काही..!!

वाटले अवचित सारेच संपले..
शब्दांनी असे, मौन हे धरले..
मनधरणी तरी किती करावी..
कमतरता ही कशी भरावी..!!

उपाय सुचला मग नामी..
शक्कल आली बघा हो कामी..
फटकारले त्यांस दुखावल्या भावना..
अवलंबिला मार्ग तोच मी जूना ..!!

म्हणालो कागदासम तू कोरा..
एकदा आरशात बघ तरी म्होरा..
घटकेत चिडला अबोला सोडाला..
शिवी हासडत कागदात उतरला..!!

तोच कागद पेश मी केला..
सांगा तुम्हाला कसा काय वाटला..??
आवडला तर लाईक करा ज़रा..
एकदा हां कागद पहा तर खरा..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment