Monday, 28 April 2014

II वाटते II

II वाटते II
**********
खुप काही करावेसे वाटते..
तुजसवे फिरून फुलावेसे वाटते..!!

वेदनेच्या झुल्यावर.
सुखाने एकदा झुलावेसे वाटते..
बेभान वाऱ्यावर..
ओठांच्या कळीने खुलावेसे वाटते..!!

अश्रुंच्या सागरात..
स्मित होडक लोटावेसे वाटते..
नैराश्याच्या गर्गेतून..
आशेच्या किना-यास भेटावेसे वाटते..!!

विस्कटल्या क्षणातून..
चोरट्या क्षणांना खेटावेसे वाटते..
विरहाच्या गावातून
मिलनाचे घर गाठावेसे वाटते..!!

नकाराच्या पंखावरून..
होकार भरारी भरावेसे वाटते..
ह्या आभासी जगात..
नयनी हर्षे निरावेसे वाटते..!!

खुप काही करावेसे वाटते..
तुजसवे फिरून फुलावेसे वाटते..!!
**********सुनिल पावार....





No comments:

Post a Comment