।। सोनी तू सोनपरी ।।
सोनी तू सुवर्णवती..
सोनेरी तव कांती..
अवखळ मी वारा..
करी कुंतली भ्रमंती..!!
मोहित मी साक्षात..
पाहता तव अक्षात..
घायाळ मी सजणी..
तव एका कटाक्षात..!!
गाला वरची खळी..
कानात सोन बाळी..
काय सांगू सोने..
ह्रदय माझ जाळी..!!
अपूर्व लावण्य राशी..
रत्नाची खाण जशी..
सोने तू सोनपरी..
सोन जस बावनकशी..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment