Monday, 28 April 2014

।। सहभाग आम्ही काय दिला ।।



।। सहभाग आम्ही काय दिला ।।

प्रजासत्ताक पार पडला..
सहभाग आम्ही काय दिला..
कोणता असा उपक्रम केला..
जागलो का मी कर्ताव्याला..??

केले वंदन झेंड्याला..
स्मरले आम्ही शहिदांना..
का चिकटून बसलो टीव्ही ला..
का बसलो fb वर चाटिंगला..??

ध्वज रोहणाचा आनंद घेतला..
उत्स्पुर्त सहभाग घेतला..
का झोपून दिवस काढला..
का सुट्टी म्हणून उपभोगला..??

प्रश्न असे वेडे
पडतात का हो तुम्हाला..??
विचारून तर पहा ज़रा..
तुम्हीच तुमच्या मनाला..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment