Tuesday, 27 May 2014

::II गोष्ट मनातली II::

::II गोष्ट मनातली II::
=============
सहज आज आठवली..
शाळेतली अधुरी कहाणी..
अजुन आहे कोरी तशी..
जराशी जुनी पुराणी..!!

भोसल्यांची ती होती..
खोसल्यांचा तो होता..
दिसायला ती सुंदर होती..
यथा तथाच तो होता..!!

बसत होते शेजारी पण..
ओळख ना झाली साधी..
कळले ना त्याचे त्याला..
प्रेमात तो पडला कधी..!!

चोरून तिज पाहे रोज..
पण धाडस ना बोलायला..
पाठीमागून जात असे..
नकळत घरी सोडायला..!!

किती क्षण आले गेले..
गाठावे ते क्षितिज कुठले..
नजरेचे ते खेळ सारे..
शब्दांना ना कंठ फुटले..!!

दिवस सरले वर्ष सरले..
आठवणीचे मेघ दाटले..
मनातल्या त्या गोष्टीने..
मनातले एक घर गाठले..!!
*******सुनील पवार.....




|| निसर्ग वारा |


🌺🌺|| निसर्ग वारा ||🌺🌺
=================
निसर्ग वारा,कोकण किनारा..
पावसाच्या धारा,रूप सुंदरा...!!

डोंगर माथी,ढग विसावता..
विलोभनीय दृश्य,दिसे पाहता...!!

ओहळ वाहती,नदी उधाणली...
प्रियतमे वदनी,आली लाली...!!

नाचती डोलती,ऋक्ष वल्ली...
जशी नाचती,चिल्ली पिल्ली..!!

मार्ग तेजाळले,जसे आरसे...
सुंदर सृष्टीचे,प्रतिबिंब दिसे...!!

हिरवा शालू,धरणी नेसली
स्वर्गातली ती अप्सरा भासली..!!

श्रावण मासी हर्ष दाटला
मनभावक कोकण नटला..!!

स्वर्ग नाही,भू-वरी ऐसा...
येवा कोकण,आपलच असा...!!
*****सुनील पवार.......

:::://जोडोनी दोन्ही कर//::::


:::://जोडोनी दोन्ही कर//::::

जोडोनी दोन्ही कर देवा...
उभा आहे तुझ्या दारी..
आवर तुझा प्रकोप आता...
नेत्र मिटा प्रलयंकारी...!!

क्रोध तुझा आम्हा जाळी...
तुझा पुत्र अश्रु ढाळी...
पाट वाहती इथे अश्रुंचे...
कशी सावरू पोरी बाळी...!!

पामर आम्ही नाही समजलो..
तुझ्या सृष्टिची नवलाई...
ओरबाडले, लुटले सारेच आम्ही..
नाहक आम्ही केली घाई...!!

दोष सारा आमुचाच देवा...
नाही जपला तुझा ठेवा...
रसातळास नेली भूमी...
उदर फोडूनी खातो मेवा...!!

आपराध आमुचा अक्षम्य तरी...
एकवार पदरात घाला...
निसर्ग नियमाचे पालन करू..
सांगू आम्ही ज्याला त्याला...!!

*चकोर*

समजेना का..??




समजेना का..??

समजेना का..?
काय असे व्हावे..
शब्द ओठावर...
तरी अडखळावे.. !!

समजेना का..?
काय असे व्हावे..
रस्ते ओळखीचे..
तरी ठेचाळावे..!!

समजेना का..?
काय असे व्हावे..
येता तू समोर..
मी बावरावे..!!

समजेना का..?
काय असे व्हावे..
तू नसताना..
रिते भासावे.. !!

समजेना का..?
काय असे व्हावे..
दिव्या साठी..
वातीने जळावे.. !!

*चकोर*


II रंग फेसबुकचे II



// रंग फेसबुकचे //
फेसबुक रंगात अनेक रंगले..
काव्य प्रतिभेने मज चिंब केले..
चिमटे कोणी इथे काढले..
कोणी बोधप्रद संभाषण केले..!!

रुसवे फुगवे इथेच जन्मले..
मैत्रीचे अनोखे दर्शन घडले..
रात्रि अपरात्री संवाद घडले..
प्रेमाचे खाते कोणी इथेच उघडले..!!

माया जाल कोणास थिटे पडले..
कोणाचे लेखन चांगलेच बहरले..
नव कवी सारे इथेच जन्मले..
चारोळी,टिप्पणीकारांचे बगीचे फुलले..!!

असे हे कलाकार खळखळते झरे..
फेसबुक गंगेला येवून मिळाले..
अश्या ह्या वाहत्या शब्द गंगेत..
मग मी सुद्धा हात धुवून घेतले..!!

*
चकोर
*

II पाढा प्रेमाचा,पाढा तिनाचा II



पाढा प्रेमाचा,पाढा तिनाचा..

तीन एके तीन...
तीन दुणे सहा....
तिने केली कोफी...
मला आवडतो चहा...!!

तीन त्रिक नऊ...
तीन चोक बारा...
उपमा झाला खारा...
म्हणालो मी आहे बरा...!!

तीना पंचे पंधरा...
तीन सक अठरा...
जेवण तयारच आहे...
राया जरा धीर धरा...!!

तीना साते एकवीस...
तीना आठे चोवीस...
प्रेमात कराव नेहमीच...
एकमेकांना मिस...!!

तीन नवे सत्तावीस...
तीन दाहे तीस...
संसार करावा नीट...
काढू नये कीस...!!

*
चकोर*

II मैत्री II



*मैत्री*
*
मैत्री एक पिंपळपान*
*
जे जपल जात पुस्तकात*
*
मैत्री एक वडाच झाड*
*
जे फोफावते चराचरात*
*
मैत्री एक फुल झाड*
*
जे धुंद करत आसमंत*
*
मैत्री एक नदीची धार*
*
जी वसते रत्नाकरात*
*
मैत्री एक चांद रात...
*
जी चमचमते नभांगणात*
*
मैत्री एक रम्य पहाट*
*
जी फुलवी रोमांच मनामनात*
*
मैत्री एक श्वास*
*
जो भिनलाय माझ्या नसानसात*
*
चकोर*

II छोटीसी बात II



.....//छोटीसी बात//.....

हमने भी की थी कभी..
एक छोटी सी बात..
याद है हमें अब भी..
वह मिठी मुलाकात..!!

सपने बूने थे इंद्रधनूके..
उडे थे बादलो के पार..
हवा के एक झोकेने..
फैक दिया जमिनपर..!!

तुट गये सपने अब..
बिघड गये हालात..
आसू अब बन गये..
बिन मौसम बरसात..!!

समजा ना कभी कोई...
वो लम्हे.. वो जजबात...
खयालो मे दब गये..
बस मेरे खयालात..!!

लिखते है अभ भी..
हम शान ए सनम..
पर छलकते है आसू..
और उमडता है गम..!!

अब तो कलम के साथ...
होती है यादोकी बात...
और कागज़ से होती है..
अक्सर मुलाक़ात..

*
चकोर*