Friday, 16 May 2014

// धडा //


धडा..

चार बुकं शिकले
जणू अतिशहाणे झाले..
मातापित्यास त्यांनी
वृद्धाश्रमात धाडले..!!

संस्कृतिस विसरले..
विसरले सारे धड़े..
सिंचले तुम्हास ज्यांनी..
त्यांनाच तुम्ही रडवले..!!

खोड जूने छाटले
नवे रोपटे सजवले..
आपल्याच कर्माने
सावलीस ते मुकले..!!

जैसे ज्याचे कर्म..
तैसे फळ त्यास मिळे..
तुम्ही दिलेला धडा
उद्या गिरवतील तुझी मुले..!!
--सुनील पवार...

No comments:

Post a Comment