Friday, 16 May 2014

// आई //




// आई //

आई असे श्रृष्टिची नवलाई..
देवांचा वास तिच्या ठाई..
आई म्हणजे मायेच घर..
वात्सल्याचा सप्त सागर..!!

आई असते देवाच आलय..
देई जीवनास तेजो वलय..
आई असे प्रेमळ अपार..
देव प्रिय अमृत धार..!!

थोर आमची ती पुण्याई..
लाभली आम्हास तू आई..
देवांस दुर्लभ तुझा वर..
पुण्याई असे तुझी थोर..!!

उमपा किती देऊ आई..
कसा होवू मी उतराई..
सोसशी तू सारा भार..
राखशी आबाद संसार..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment