।। अंगार ।।
अंगार फुलला वाटेवर..
हात जिथे सुटला होता..
हिरव्या प्रेम पालवीचा..
दाह तिथे झाला होता..!!
पाहिलेस ना वळुन एकदा..
अश्रु नयनी आटला होता..
राळ उडाली दूर आसमंती..
वारा नाराज सुटला होता..!!
ऐकलिस ना हाक आर्त..
कंठ माझा सुकला होता..
गाठायचे होते क्षितिज मज..
मार्ग माझा चुकला होता..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment