Tuesday, 27 May 2014

|| निसर्ग वारा |


🌺🌺|| निसर्ग वारा ||🌺🌺
=================
निसर्ग वारा,कोकण किनारा..
पावसाच्या धारा,रूप सुंदरा...!!

डोंगर माथी,ढग विसावता..
विलोभनीय दृश्य,दिसे पाहता...!!

ओहळ वाहती,नदी उधाणली...
प्रियतमे वदनी,आली लाली...!!

नाचती डोलती,ऋक्ष वल्ली...
जशी नाचती,चिल्ली पिल्ली..!!

मार्ग तेजाळले,जसे आरसे...
सुंदर सृष्टीचे,प्रतिबिंब दिसे...!!

हिरवा शालू,धरणी नेसली
स्वर्गातली ती अप्सरा भासली..!!

श्रावण मासी हर्ष दाटला
मनभावक कोकण नटला..!!

स्वर्ग नाही,भू-वरी ऐसा...
येवा कोकण,आपलच असा...!!
*****सुनील पवार.......

No comments:

Post a Comment