Friday, 16 May 2014

II केशवा बा नारायणा II




II केशवा बा नारायणा II

विनवितो मी देवा..
केशवा बा नारायणा..
मातला रावण इथे..
धाडा आता यमसदना..!!

रोज होते हरण सीता..
त्रासली सारी जनता..
तूच माय बाप पिता..
घ्या अवतार आता..!!

मातले कौरव सारे..
हात घालती वस्त्रा ते..
आर्त पुकारे द्रौपदी..
धावा लज्जा रक्षणा ते..!!

सोडा आता बासुरी..
चक्र सुदर्शन घ्या हाती..
धर्म रक्षणाय आता..
नष्ट करा असुर निती..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment