//आठवणी शाळेच्या//
आठवतात मज शाळेचे दिवस..
वर्ग शिक्षक ते पीटर सर..
लाजरे बुजरे थोडे शर्मिले..
शिकवायचे इंग्लिश सुंदर..!!
गायन शिकवीत जोशी सर..
उडवीत असत सार्यांची टर..
बिनधास्त मस्त मौला हर पल..
दोघे मित्र जानी जिगर..!!
शिकवीत असता पीटर सर..
नेमके यायचे जोशी सर..
फिरकी घेत उडवायचे टर..
हास्याची उठे एकच लहर..!!
गायचे ते फारच सुंदर..
गाण्यात असत पीटर सर..
असेच होते दोस्तीचे सदर..
जपले जे अंतरी निरंतर..!!
उदाहरण होती त्यांची मैत्री..
जसा कोंदणात तो कोहिनूर..
एक गीत..तर एक सूर..
ख्याती होती सर्व दूर..!!
पाहता मुलांस वाटे कुतूहल..
जुळतात पुन्हा शाळेचे सूर..
मनास माझ्या लागे हूर हूर ...
रम्य ते दिस राहिले दूर.!!
No comments:
Post a Comment