II पाहून हिरवे रान II
पाहून हिरवे रान..
माझे हरपले भान..
फुलला निसर्ग छान..
भासे सतरंगी कमान..!!
पहाट समयी सुखावे..
मज धुक्याचे पांघरुण..
झोंबे शीतल वारा..
देई उबारा किरण..!!
दव बिंदुंचे थवे..
शुभ्र शीतल चांदण..
चमचमती हिरे..
त्यास सुवर्ण कोंदण..!!
हिरवे,पिवळे गोजिरे..
गालिचे पसरले सान..
लाल निळी कमान..
सुंदर कशिदा छान..!!
कशी बागडती पाखरे..
आकर्षिती सुमन..
तैसे माझे मन..
होई क्षणो क्षण..!!
*चकोर*
पाहून हिरवे रान..
माझे हरपले भान..
फुलला निसर्ग छान..
भासे सतरंगी कमान..!!
पहाट समयी सुखावे..
मज धुक्याचे पांघरुण..
झोंबे शीतल वारा..
देई उबारा किरण..!!
दव बिंदुंचे थवे..
शुभ्र शीतल चांदण..
चमचमती हिरे..
त्यास सुवर्ण कोंदण..!!
हिरवे,पिवळे गोजिरे..
गालिचे पसरले सान..
लाल निळी कमान..
सुंदर कशिदा छान..!!
कशी बागडती पाखरे..
आकर्षिती सुमन..
तैसे माझे मन..
होई क्षणो क्षण..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment