Friday, 16 May 2014

:::// श्रावण आला //:::

:::// श्रावण आला //:::
==============
श्रावण आला..श्रावण आला..
घेऊन व्रत वैकल्याला..
मोर पिसारा मनात फुलला..
रिमझिम पाऊस पडू लागला..!!

मोद भरे वारा भिरभिरला..
तुषारात तो चिंब न्हाला..
मेघ पदर क्षणे दूर सारिला..
किरण कवडसा हळूच फुलला..!!
सोन प्रकाशी दिशा उजळल्या..
इंद्रधनू सवे खेळू लागल्या..
किलबिल पाखर सूर मिसळला..
सप्तरंग गगनात उधळला..!!
धरणी माई मनी हासली..
तृषा सरली, तृप्त झाली..
नवा साज हिरवाई ल्याली..
डोलती लतिका,वृक्ष वल्ली..!!
फुले रंगली छान हसली..
व्रत वैकल्ये देवा पुजली..
दरवळे मन प्रसन्न झाली..
स्वर्गी देवे ताटी उघडली..!!
****सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment