Friday, 16 May 2014

:::// लिलाव //:::



:::// लिलाव //:::

गरीबांचा इथे बाजार भरला..
सरकारने बोलीस लावला..
३५ रुपये भाव ठरला..
गरीब आज निलाम झाला..!!

सुवर्ण काळ पुन्हा आला..
रंकाचा आता राव झाला..
आकडेवारीत गरीब मेला..
नव्या रूपाने पुन्हा जन्मला..!!

सरकारी तिजोरीत पैसा कुजला..
शिधा सारा वाण्याने गिळला..
कार्ड ओळखती फक्त रंगाला..
काळा बाजार सर्वत्र फुलला..!!

आता ना कोणी गरीब उरला..
श्रीमंत यादीत भारत झळकला..
जावई शोध हा कोणी लावला..
द्या धन्यवाद तुम्ही सरकारला..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment