:::// बिंब प्रतिबिंब //:::
बिंब प्रतिबिंबात हरवले..
नसता तू प्रतिबिंबास पुसले..
बोलेना काहीच मूक जसा..
का ठेवला मी असा भरवसा..!!
मन गहिवरले आतुर झाले..
वाट पाहुनी डोळे शिणले..
दिवसा मागून दिवस सरले..
मुश्किल झाले मिलन आपले..!!
विणले जाळे विदीर्ण झाले..
आठवणीचे धागे विरले..
ठिगळ आता कुठवर लावू..
जीवनी आकाश फाटले..!!
सुटली ना आस अजूनही..
येशील तू कधी परतुनी..
समजावते मी वेड्या मना..
उजळीत आता आठवणी..!!
*चकोर*
बिंब प्रतिबिंबात हरवले..
नसता तू प्रतिबिंबास पुसले..
बोलेना काहीच मूक जसा..
का ठेवला मी असा भरवसा..!!
मन गहिवरले आतुर झाले..
वाट पाहुनी डोळे शिणले..
दिवसा मागून दिवस सरले..
मुश्किल झाले मिलन आपले..!!
विणले जाळे विदीर्ण झाले..
आठवणीचे धागे विरले..
ठिगळ आता कुठवर लावू..
जीवनी आकाश फाटले..!!
सुटली ना आस अजूनही..
येशील तू कधी परतुनी..
समजावते मी वेड्या मना..
उजळीत आता आठवणी..!!
*चकोर*

No comments:
Post a Comment