Friday, 16 May 2014

// चिखल आणि कमळ //



// चिखल आणि कमळ //

फुलले कमळ कसे चिखलात..
नसे त्यास कसलीच भ्रांत..
दिसे सुंदर रूप मनोहर..
देखणे लावण्य नखशिखांत..!!

देवाधिकात असे कमळास मान..
गणेशा हाती डुले झोकात..
सरस्वती त्यात विराजमान..
कमळाची असे निराळी बात..!!

सांगा तो चिखल काय जाहला..
लोक आता तळे म्हणतात..
कमळ स्पर्शाने पावन जाहला..
पावे समाधान पंक हसे मनात..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment