Friday, 16 May 2014

// पुतळे //




(कुसुमाग्रजांच्या अखेर कमाई ह्या काव्यातील संदर्भ घेऊन केलाला छोटासा प्रयास)

// पुतळे //

चौकात पुतळ्यांची भेट ठरली..
मध्यरात्रीची वेळ होती ठरवली..
गळाभेट झाली,घेतली ख्याली खुशाली..
आता पुतळे मंडळी बोलती झाली..!!

रात्र वाढली,गप्पांना रंगत चढली..
सूर एक होता देशाची वाट लागली..
जिवंत होतो तेव्हा एक होतो..
मेल्यावर का आमची विभागणी झाली..!!

जाईना जाता सल मनातली..
का अशी वाट्यास विटंबना आली..
स्वातंत्रासाठी एक होऊन लढली..
मग जनता प्रांतात का कशी अडकली..!!

नाही समजले कधी पहाट झाली..
जागेवर जाण्याची लगबग सुरु झाली..
गडबडीत पुतळ्यांची जागा बदलली..
अन काय! झोपलेली जनता जागी झाली..!!

पाहता पुतळ्यांची ही अदलाबदली..
जनता जनार्दन तात्काळ खवळली..
अनुयायांच्या नावे खडे फोडू लागली..
शहरात चक्क दंगल सुरु झाली..!!

आपापसात तावाने भांडू लागली..
डोकी एकमेकांची फोडू लागली..
मिळेल त्या वस्तूंची नासधूस केली..
आपल्याच संपत्तीची राख रांगोळी केली..!!

सगळे सरले सरकारला जाग आली..
वरवरची जुजबी मलमपट्टी केली..
कारण शोधण्या समिती नेमली..
तरी कारणं मात्र गुलदस्त्यात राहिली..!!

पुतळ्यांभोवती पोलिस चौकी थाटली..
स्वातंत्र भारतात नशिबी पुन्हा नजर कैद आली..
अनुयायांनी संकल्पनेला मुठ माती दिली..
एकाच घरात थाटल्या वेग वेगळ्या चुली..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment