::://मैदान//:::
आज मैदानांची का उडली रया..?
पाहता दुरावस्था खेद झाला मनाला..
काय बरे झाले त्याच्या अस्तित्वाला..
विचारला प्रश्न मी माझ्या मनाला..!!
मुबलक होती मैदाने पूर्वी..
राजकारण्यांच्या डोळ्यात खुपली..
विकास या गोंडस नामे..
धन दांडग्यांच्या ट्रस्टला विकली..!!
मैदाने आपसुक खाजगी झाली..
खेळण्यावर मग बंदी आली..
शोभेची एक बाग फुलली..
आलिशान झोपडी कोपर्यात सजली..!!
येण्या जाण्याची वेळ ठरली..
तास दोन तास वाट्याला आली..
अशी हि एक कहाणी..
ऐका पुढे अजून उरलेली..!!
राजकारण्यांचे हात करून ओले..
लाटली मैदाने झोपडी माफियांनी..
झोपड्या उभारून गरजूना विकली..
करून होळी मैदानाची, दोघांनीही पोळी शेकली..!!
कट कारस्थानाचा बळी ठरली..
हेतुपरस्पर मैदाने गिळली..
खेळण्यास आता उरली गल्ली..
मैदाने कायमची हद्दपार झाली..!!
मैदाने कायमची हद्दपार झाली..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment