Friday, 16 May 2014

II मी माझ्यातला II




II मी माझ्यातला II

राजा बदलला,राणी बदलली..
कहाणी का अधूरी राहिली..
प्रेम बदलले,प्रीत बदलली..
रीत का जुनीच राहिली..!!

साज बदलले,स्वप्ने बदलली..
अर्ध्या रस्त्यात कुठे हरवली..
दुःख बदलले,वेदना बदलली..
तरी डोळ्यातून का वाहिली..!!

मन बदलले,दगड पांघरले..
करुणा का मग पाझरली..
स्थळ बदलले,वेळ बदलली..
परिस्थिती जैसे तै राहिली..!!

चेहरा बदलला,मुखवटा चढला..
न जाणे कसा गळुन पडला..
हासले मन त्याच क्षणाला..
म्हणाले..
ओळख रे तू तुझ्यातला..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment