Tuesday, 27 May 2014

।। आता नाही ।।



।। आता नाही ।।
आता मुळीच रडणार नाही..
कुपितिल अत्तर सांडणार नाही..!!

आता कधीच हरणार नाही..
मनाशी मनात भांडणार नाही..!!

आता स्वतःस भरडणार नाही..
सुपातलं जात्यात कांडणार नाही..!!

आता कोणास नाडनार नाही..
तुटल्या मनास सांधणार नाही..!!

आता कशास बधणार नाही..
सुटल्या गाठी बांधणार नाही..!!
*चकोर*

No comments:

Post a Comment