:::// एक होता दगड //:::
एक होता दगड रस्त्यात पडलेला..
ठेचाळती लोक शिव्या घालती त्याला..
परी ना कोणी कधी उचलले त्याला..
उन्ह वारा सोसत होता तसाच पडलेला..!!
जात होता फ़क़ीर त्याच मार्गाने..
ठेचाळला क्षणात त्याच दगडाने..
कनवाळू फ़क़ीर अंतरी कळवळला ..
उचलूनी दगडास बाजुला ठेवला..!!
मग पारावरच्या पोरांनी चमत्कार केला..
साफ़ करोनि शेंदुरात माखला..
वर दोन रुपायाचा हार घातला..
उधाण आले मग त्यांच्या भक्तिला ..!!
बघता बघता मंदिर विशाल सजले..
दगडाला हक्काचे घर मिळाले..
मंदिरात मजेत विराजमान झाले..
दगडाचे आता दिवस पालटले..!!
दगडा साजेस नामकरण झाले..
शिव्या घालणारेच आता पूजू लागले..
दगडाची मनधरणी करू लागले..
दगडाला आता देवपण लाभले..!!
*चकोर*
एक होता दगड रस्त्यात पडलेला..
ठेचाळती लोक शिव्या घालती त्याला..
परी ना कोणी कधी उचलले त्याला..
उन्ह वारा सोसत होता तसाच पडलेला..!!
जात होता फ़क़ीर त्याच मार्गाने..
ठेचाळला क्षणात त्याच दगडाने..
कनवाळू फ़क़ीर अंतरी कळवळला ..
उचलूनी दगडास बाजुला ठेवला..!!
मग पारावरच्या पोरांनी चमत्कार केला..
साफ़ करोनि शेंदुरात माखला..
वर दोन रुपायाचा हार घातला..
उधाण आले मग त्यांच्या भक्तिला ..!!
बघता बघता मंदिर विशाल सजले..
दगडाला हक्काचे घर मिळाले..
मंदिरात मजेत विराजमान झाले..
दगडाचे आता दिवस पालटले..!!
दगडा साजेस नामकरण झाले..
शिव्या घालणारेच आता पूजू लागले..
दगडाची मनधरणी करू लागले..
दगडाला आता देवपण लाभले..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment