Tuesday, 27 May 2014

:::://जोडोनी दोन्ही कर//::::


:::://जोडोनी दोन्ही कर//::::

जोडोनी दोन्ही कर देवा...
उभा आहे तुझ्या दारी..
आवर तुझा प्रकोप आता...
नेत्र मिटा प्रलयंकारी...!!

क्रोध तुझा आम्हा जाळी...
तुझा पुत्र अश्रु ढाळी...
पाट वाहती इथे अश्रुंचे...
कशी सावरू पोरी बाळी...!!

पामर आम्ही नाही समजलो..
तुझ्या सृष्टिची नवलाई...
ओरबाडले, लुटले सारेच आम्ही..
नाहक आम्ही केली घाई...!!

दोष सारा आमुचाच देवा...
नाही जपला तुझा ठेवा...
रसातळास नेली भूमी...
उदर फोडूनी खातो मेवा...!!

आपराध आमुचा अक्षम्य तरी...
एकवार पदरात घाला...
निसर्ग नियमाचे पालन करू..
सांगू आम्ही ज्याला त्याला...!!

*चकोर*

No comments:

Post a Comment