Friday, 16 May 2014

:://कविता//:::




:://कविता//:::

आज मज कविता दिसली..
कशी कोणास सुचली..
होती अलंकारे नटलेली..
सहज शब्दात बहरलेली..!!

पाहताच मज भावली..
काव्या ती उत्स्पुर्त..
आपलीसी करण्या मग..
शब्द केले सुपूर्त..!!

अडखळत बावरत..
गुंफले भाव कोंदणात..
साथ ही दिली तिने..
मग उतरली कागदात..!!

हर्षभरे तिज मिरवली..
मित्रांस बहु आवडली..
स्वर्गही मग अवघे..
मज दोन बोटे उरली..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment