:::// तो आणि ती //:::
दूर गेला तो..
वाट पाहे ती..
व्यस्त कामात तो..
त्रस्त तळमळे ती..!!
उशिरा येणारा तो..
वाट पाहणारी ती..
तिच्यासाठी झटतो तो..
त्याच्यासाठी व्याकुळ ती..!!
वादळ वारा तो..
निर्झर झरा ती..
आग असतो तो..
उबारा असते ती..!!
स्वप्न असतो तो..
सुख असते ती..
अन्न असतो तो..
निवारा असते ती..!!
सुखासाठी तिच्या..
दूर जातो तो..
सुखरूप यावा तो..
प्रार्थना करते ती..!!
संसाररथ असतो तो..
रथचक्र असते ती..
हाकती दोघे मिळूनी..
श्री आणि श्रीमती..!!
*चकोर*
दूर गेला तो..
वाट पाहे ती..
व्यस्त कामात तो..
त्रस्त तळमळे ती..!!
उशिरा येणारा तो..
वाट पाहणारी ती..
तिच्यासाठी झटतो तो..
त्याच्यासाठी व्याकुळ ती..!!
वादळ वारा तो..
निर्झर झरा ती..
आग असतो तो..
उबारा असते ती..!!
स्वप्न असतो तो..
सुख असते ती..
अन्न असतो तो..
निवारा असते ती..!!
सुखासाठी तिच्या..
दूर जातो तो..
सुखरूप यावा तो..
प्रार्थना करते ती..!!
संसाररथ असतो तो..
रथचक्र असते ती..
हाकती दोघे मिळूनी..
श्री आणि श्रीमती..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment