Friday, 16 May 2014

II कधी होईल पहाट II


II कधी होईल पहाट II

दगडाचा देव तू..का दगड जाहला..
बडव्यास लखलाभ..मज का विसरला..!!

येता नित्य दर्शना..का अडवीती वाट..
तुझ्या दर्शनाची..कशी वाकडी रे वाट..!!

भेटी साठी तुझ्या..का गोंजारावा भाट..
मांडला बाजार..सारा श्रीमंतीचा थाट..!!

रुपयाची घेसी तू..का रे गळाभेट..
तिष्टतो दारात..त्यास देसी दुरून भेट..!!

गाभा-यात दिसे मज..तिमिर का दाट..
सांग आता देवा..कधी होईल पहाट..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment