Tuesday, 27 May 2014

// विठू माउली //




// विठू माउली //

तुझ्याच भेटीची मज..
लागलीसे आस..
निजरूप दाखवा पांडुरंगा..
मज पामरास..!!

तूच माझी तहान..
तूच माझी भूक..
चरणी तुझिया देवा..
असे माझे सुख..!!

संग घडो सदा सर्वदा..
ना कधी विसर व्हावा..
तुझियाच चरणी मझा..
देह हां पडावा..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment