Tuesday, 27 May 2014

।। नशीब ।।


।। नशीब ।।
नशीबाचे फासे जोरात होते..
अडकले बाराच्या फेऱ्यात होते..!!

घेईन म्हटल कवेत एकदा..
आपल्याच ते तोऱ्यात होते..!!

लागेना मनाचा थांग काही..
मन मनाच्या होऱ्यात होते..!!

पडलीच गाठ चुकुन कधी..
हुंदडत आसवांच्या खोऱ्यात होते..!!

उशिरा उमगले मज सारे..
नशीब मनगटाच्या जोरात होते..!!

सुटणार ना आता कधी..
बांधले घामाच्या दोऱ्यात होते..!!
*चकोर*
 

No comments:

Post a Comment