Friday, 16 May 2014

।। क्षमा करा देवा ।।



।। क्षमा करा देवा ।।

क्षमा करा देवा..
पावित्र्य भंगले..
अति उत्साहात
नाही समजले..!!

ढोल झांज ताशे..
ते हो कसले..
आमचे मन इथे..
डीजेत रमले..!!

वाटे सकल जना..
भक्तित रंगले..
काया वाचा मन..
दारुत झिंगले..!!

सदबुद्धी दया आता..
बाप्पा आम्हाले..
घडावयास नको जे..
तेच घडले..!!

रोज नवीन किती..
संकल्प केले..
पुन्हा पुन्हा नव्याने..
आम्हीच मोडले..!!

शिकले सवरले बहु..
वाचन केले..
अकलेचे मात्र आम्ही..
दिवाळेच काढले..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment