// धर्मवाद //
रोज उफाळतो धर्म वाद..
वाहत चाललो त्या प्रवाहात..
नाही सोडत कोणीच हटवाद..
नकळत उतरतो राजकारणात..!!
रोज होते एक नवी पहाट..
रमतो आम्ही इतिहासात..
आतंरिक प्रेमाच्या नादात..
राम की रहीम च्या वादात..!!
लक्तरे मांडतो आमचीच आम्ही..
जगाच्या या बाजारात..
वाटून घेतले देव आपसात..
धर्म जातीच्या आधारात..!!
एकाच मातेची लेकर आपण..
नेमक हेच का विसरतात..
जखमांवर फुंकर मारायची सोडून..
धन्यता मानतात मीठ चोळण्यात..!!
*चकोर*
रोज उफाळतो धर्म वाद..
वाहत चाललो त्या प्रवाहात..
नाही सोडत कोणीच हटवाद..
नकळत उतरतो राजकारणात..!!
रोज होते एक नवी पहाट..
रमतो आम्ही इतिहासात..
आतंरिक प्रेमाच्या नादात..
राम की रहीम च्या वादात..!!
लक्तरे मांडतो आमचीच आम्ही..
जगाच्या या बाजारात..
वाटून घेतले देव आपसात..
धर्म जातीच्या आधारात..!!
एकाच मातेची लेकर आपण..
नेमक हेच का विसरतात..
जखमांवर फुंकर मारायची सोडून..
धन्यता मानतात मीठ चोळण्यात..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment